BJPMaharashtra GovPoliticsTravelमुंबईराजकारण

‘वंदे भारत मिशन’ला महाराष्ट्र शासनाकडून प्रतिसादच दिला जात नाही : आशिष शेलार

मुंबई : राज्यात मजुरांना अन्नपाणी दिले नाही, चाकरमान्यांना एसटी बस देत नाहीत म्हणून त्यांची सहनशीलता संपतेय. तर दुसरीकडे आपले विद्यार्थी, महिला व आखाती देशात अडकलेले मजूर महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. मात्र ‘वंदे भारत मिशन’ला महाराष्ट्र शासनाकडून प्रतिसादच दिला जात नाही, असा आरोप आमदार आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.

‘वंदे भारत मिशन’ला महाराष्ट्र शासनाने प्रतिसाद देऊन परदेशात अडकलेल्या विद्यार्थी, मजूर, महिलांना महाराष्ट्रात येऊ द्यावे. शासनाने जुलमी वागू नये- असेही शेलार म्हणाले . ‘वंदे भारत’ मिशनमधून परतलेल्यांना क्वारंटाईनसाठी महागडी हॉटेल्स का त्यांच्या माथी मारताय? तिथून घरी परताना ही अशीच गैरसोय का करताय? लोकांचे का हाल करताय? का सगळ्याच भूमिका आडमुठ्या घेताय? वेळ काय, परिस्थिती काय, राज्य शासन करतेय तरी काय? आपल्याच माणसांशी शासन का जुलमी वागतेय? असे विविध सवाल शेलार यांनी ठाकरे सरकारला केले आहे .

 

देशांतर्गत मजूर, कामगार विद्यार्थी, गरोदर माता यांच्या स्थलांतरासाठी केंद्राने वंदे भारतची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याला राज्य सरकारनेही प्रोत्साहन देत सर्वसामान्य नागरिकांच्या स्थलांतरानंतर त्यांची योग्य ती सोय करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button