Maharashtra Govमनोरंजन

राज्यात चित्रपटगृह सुरु करण्याच्या विचारात राज्य सरकार, अमित देशमुखांनी दिली माहिती

मुंबई: केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक ५मध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी देण्यात आहे. अशातच केंद्र सरकारने आज (६ ऑक्टोबर) चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केलीआहे. सिनेमागृह सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. त्यामूळे राज्य सरकारही त्या दिशेने पावले उचलताना दिसत आहे.

“सिनेमागृहं सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला असून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करतं आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपट, नाटकांसाठी मौसम असतो. त्यामुळे चित्रपटगृहं सुरु करण्याची संमती द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात सरकार सकारात्मक असून लवकच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.” “महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळी शिथीलता देण्याआधी विचार केला जाईल मगच निर्णय घेतला जाईल. गेल्या सहा महिन्यांपासून सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी अडचणीत आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर काढणं आणि या समस्येतून मार्ग काढू. लवकरच यासंदर्भातलं चित्र स्पष्ट होईल” असंही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button