Health & Fitnessलाइफस्टाइललाईफस्टाईल

अतिविचार टाळण्यासाठी करा ‘ हे’ उपाय

आपण नेहमीच विचारांच्या जाळ्यात अडकलेलो असतो. एखादी घटना आपल्या सोबत घडते आणि आपण त्याबाबत विचार करायला लागतो. तोच विचार कधी या ‘अतिविचारा’त बदलतो ते आपलं आपल्याला सुद्धा काळात नाही. मग यानंतर येतो तो या विचारांचा मानसिक ताण. हळूहळू हा मानसिक ताण शरीरावर सुद्धा आपला प्रभाव पाडतो आणि मग शरीराचा ऱ्हास चालू होतो. कुठल्याही व्यसनापेक्षा अतिविचारांचे व्यसन हे सगळ्यात हानिकारक. म्हणूनच अतिविचार करणे हे मनासह शरीरालाही घातक ठरते.

१. घटनेला भविष्य काळात कसे बघाल याचा विचार करणे

समजलं नाही ना? एखादी घटना जेव्हा आपल्यासोबत घडते तेव्हा आपण असा विचार करायचा की या घटनेला आपण भविष्यात कसे बघू? ही आपल्या आयुष्यात एवढी का परिणाम करतेय? हे प्रश्न स्व:ताला विचारा आणि जर याचे उत्तर नाही असे असेल तर मुद्दामून त्या येणाऱ्या विचारांना थांबवा.

२.निर्णय घेण्याचा वेळ कमी ठेवा.

अतिविचार हा तेव्हाही येतो जेव्हा आपल्याला एखाद्या स्थितीबाबत निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे हा अतिविचार थांबवण्यासाठी निर्णय घेण्याचा वेळ कमी करा. जसे की जर काम छोटे असेल तर ५ मिनिटापेक्षा जास्त वेळ लाऊ नका आणि जर एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर स्व:ताला एक डेडलाईन द्या.

३. “खाली दिमाग सैतान का घर”

हो , रिकामी डोके हे अतिविचारांना कारणीभूत ठरते त्यामुळे काहीना काही काम करत राहा. स्व:ताला कोणत्याही कामात व्यग्र ठेवा. जेणेकरून दुसरे विचार मनात येणार नाही. वाचन किंवा गाणी ऐकणे हे वेळ घालवण्यास खूप­­­­ चांगले आहे.

४. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात हे मान्य करणे.

आपण माणूस आहोत आणि माणसाच्या हातातून चुका होतात. प्रत्येक परिस्थिती आपल्या हातात नसते तसेच आपण प्रत्येक काम परफेक्ट करू शकत नाही. याची मनाला समजूत घाला. कारण सगळ्याच गोष्टी या तुमच्या हातात नसतात. असा विचार केल्यावर येणारा अतिविचार हा आपोआप थांबतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button