रायगडशिक्षण

आमदार संजय केळकर यांची मागणी मान्य, शाळांचे वीजबील ग्रामपंचायत भरणार

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे वीजबील न भरण्यात आल्याने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. अशा पध्दतीने राज्यातील प्राथमिक शाळांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, भगवान घरत यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांची भेट घेतली आणि या समस्येबाबत त्यांच्याशी चर्चा करुन निवेदनही देण्यात आले. शिक्षक परिषदेकडून पाठपुरावा सुरु असताना संजय केळकर यांनी २५ जून रोजी विधीमंडळात तारांकित प्रश्‍न उपस्थित करुन या समस्येला वाचा फोडली. तर दुसर्‍याच दिवशी रायगड जिल्हा परिषद शाळांचे वीजबील ग्रामपंचायतीने भरावे असे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हळदे यांनी काढले. त्यामुळे या शाळांना दिलासा मिळाला. येथील शिक्षकांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button