Travelपालघर

नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार-मोखाड्यातील रस्तेही पाण्याखाली गेले असून मोखाडा येथे रस्ता खचल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मोखाड्यातील ग्रामस्थांचा नाशिकशी संपर्क तुटला आहे. तर त्र्यंबकेश्वर येथेही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. दरम्यान, इगतपुरीकडे जाणाऱ्या रेल्वेरुळावर डोंगरावरची माती पडल्याने मध्य रेल्वेची इगतपुरी-कसारा वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर ही वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आल्याचे रेल्वेने स्पष्ट केल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button