मग भाजपच्या आंदोलनाला का घाबरताय? – आशिष शेलार
मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून त्यातही महाराष्ट्रातील संख्या सर्वात जास्त आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने येत्या २२ तारखेला ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या आंदोलनांमधून भाजपाला काहीही साध्य होणार नसून त्यांनी कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारला साथ द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे कामगारांचे हाल झाले म्हणून भाकपा आंदोलन करणार..या पुर्वी देशभरात डाव्या पक्षांनी काळे झेंडे दाखवून आंदोलन …वांद्रे स्टेशन बाहेर मजूरांना आंदोलन केले, तर मालेगावात कॉंग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी धरणे आंदोलन केले..बेस्ट पाठोपाठ…(1/2)#महाराष्ट्रबचाव
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 21, 2020
आणि हाच धागा पकडून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला लक्ष केले आहे. लॉकडाऊनमुळे कामगारांचे हाल झाले म्हणून भाकपा आंदोलन करणार..या पुर्वी देशभरात डाव्या पक्षांनी काळे झेंडे दाखवून आंदोलन …वांद्रे स्टेशन बाहेर मजूरांना आंदोलन केले, तर मालेगावात कॉंग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी धरणे आंदोलन केले..बेस्ट पाठोपाठ आते शासकीय कर्मचारीही आंदोलन करणार..काल मुंबई महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवक मिलिंद वैद्य रस्त्यावर बसले…लोकशाहीने आंदोलनाचा हक्क सगळ्यांना दिलाय..मग भाजपच्या आंदोलनाला का घाबरताय? जनतेचा आक्रोश आम्ही मांडला तर सरकारच्या कानाचे पडदे फाटतील याची भीती वाटतेय का? असे म्हणत शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष केले आहे.
शासकीय कर्मचारीही आंदोलन करणार..काल मुंबई महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवक मिलिंद वैद्य रस्त्यावर बसले…लोकशाहीने आंदोलनाचा हक्क सगळ्यांना दिलाय..
मग भाजपच्या आंदोलनाला का घाबरताय?जनतेचा आक्रोश आम्ही मांडला तर सरकारच्या कानाचे पडदे फाटतील याची भीती वाटतेय का? (2/2)#महाराष्ट्रबचाव— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 21, 2020

