Maharashtra Govमुंबई

मे महिन्यात आतापर्यंत ३२ लाख शिवभोजन थाळ्यांचे, तर ७३ लाख ६५ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई, दि. 31 : राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 मे ते 30 मे पर्यंत राज्यातील 1 कोटी 51 लाख 36 हजार 987 शिधापत्रिकाधारकांना 73 लाख 65 हजार 400 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच 32 लाख 77 हजार 778 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 20 लाख 55 हजार 420 क्विंटल गहू, 15 लाख 79 हजार 118 क्विंटल तांदूळ, तर 21 हजार 887 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतू लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 4 लाख 37 हजार 334 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे. त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 4 मे पासून एकूण 1 कोटी 30 लाख 72 हजार 758 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 5 कोटी 88 लाख 75 हजार  537 लोकसंख्येला 29 लाख 43 हजार 780  क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.  

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील  उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन आता पर्यंत 7 लाख 87 हजार 80 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 78 हजार 105 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना मे व जून 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.

राज्यात 1 मे ते  30 मे पर्यंत 838 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 32 लाख 77 हजार 778 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button