ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयावर पंकजा मुंडेंचा आक्षेप
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला . ठाकरे सरकारच्या या निर्णावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आक्षेप नोंदवला आहे. शिक्षकांच्या ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या बदल्यांमुळे भ्रष्टाचार वाढेल असे मत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले .
कोरोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या off line पद्धतीने होणार असे ऐकले,ज्याचा वशिला नाही,वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा offlineचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल राज्यसरकार ने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे..पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 16, 2020
“कोरोना’ च्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असे ऐकले. ज्याचा वशिला नाही, वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑफलाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल. राज्य सरकारने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

