Maharashtra Govमुंबईसोशल मीडिया

…नाहीतर हजारो लोक रस्त्यावर असतील ; प्रकाश आंबेडकर सरकारला इशारा

मुंबई : कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे . राज्यात आता अनलॉकचा टप्पाही सुरु झाला आहे . मात्र तरीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडलेली असून बससेवा तत्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचं डफली बजाव आंदोलन नुकतंच पार पडले . यावेळेस फक्त डफली घेऊन रस्त्यावर उतरलो मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू न झाल्यास हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा दिला आहे.

ट्विटरवरून राज्य सरकारला इशारा देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘सार्वजनिक वाहतूक बंद ठेऊन किंवा अगदी कमी क्षमतेवर चालवण्यामागे यांचे खासगीकरण करून कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा घाट घातला जात आहे .यावेळी फक्त डफ घेऊन आलो, पुढच्यावेळी हजारो लोकं असतील!’

दरम्यान मुंबईच्या बेस्ट व एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांसोबत काल प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडली. राज्य सरकार सार्वजनिक वाहतूक सुरू करणार नसेल तर पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आंबेडकरांनी दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button