Maharashtra GovPoliticsमुंबई

नवरात्रोत्सवाबाबत सरकारने नियमावली जाहीर करावी : आशिष शेलार

मुंबई : नुकताच गणपती बाप्पाना निरोप देण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच गणेश मुर्त्यांबाबतही सरकारने काही नियम लादले होते. त्यामुळे मूर्तिकारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. याचं पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी नवरात्रोत्सवाबाबत सरकारने नियमावली जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

गणेश मुर्तींची लगबग संपली की मुर्तीकार देवीच्या मुर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे यावेळी कोरोनामुळे देवीच्या मुर्तीची उंची किती असणार? सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? याबाबतची स्पष्टता वेळीच मुर्तीकरांना द्या, अशी मागणी शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button