सध्या ‘मास्क’ हीच उत्तम लस – मुख्यमंत्री
मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे तर, रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आता महाराष्ट्राचा कोरोनाचा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे, कोरोनाची लस अद्याप येू शकलेली़ नाही त्यामुळे ‘करोनाची लस प्राप्त होईपर्यंत मास्क हीच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करून द्या. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी मास्क, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता अशी मां कसम सर्वानी घ्यावी,’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठी अफेरेसिस युनिटचे दूरदृष्य प्रणालीच्या सहाय्याने उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. तसेच, रत्नागिरीबद्दल बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी अशी व्यवस्था झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असे त्यांनी सांगितले.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे. याच, पद्धतीने आगामी काळात जनजागृती करून करोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता या बाबत प्रत्येकापर्यंत जनजागृती करा,’ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.


