उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने महापूर; १७०हून अधिक बेपत्ता!
उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातील जोशीमठ तालुक्यात मोठा हिमकडा कोसळला आहे. हिमकडा कोसळल्यामुळे नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. या दुर्घटनेत अनेक लोकं बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात आज सकाळी ही घटना घडली आहे. हिमकडा कोसळून धौली गंगा नदीत कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. हिमकडा कोसळल्यामुळे धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तरांखडमध्ये SDRF टीम नदी शेजारी राहणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. काही गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अजूनही काही ठिकाणी लोकं अडकलेली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नदीला महापूर आला आहे, पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे छोटे-मोठे बंधारे हे फुटले आहे. खबरदारी म्हणून किर्ती नगर, देवप्रयाग, मुनी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाण्याचा वेग जास्त प्रमाणात असल्यामुळे काही लोकं आणि घरं वाहून गेली आहे,अशी माहिती उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने नद्यांना आलेल्या महापुराच्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या मदतकार्यासाठी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मोठी देणगी जाहीर केली आहे. आपले कसोटी सामन्याचे पूर्णच्या पूर्ण शुल्क तो या मदतनिधीला देणार आहे. या मदतकार्याला इतरांनीही मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही त्याने केले आहे.
उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात जोशीमठ येथे हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला महापूर आला आणि त्यामुळे हिमालयातील वरच्या भागात फार मोठे नुकसान झाले. रिषभ पंत हा उत्तराखंडचाच खेळाडू असून हरिद्वार जिल्ह्यातील रुडकी हे त्याचे गाव आहे.
या दुर्दैवी घटनेबद्दल ट्विट करताना त्याने म्हटलेय की, उत्तराखंडातील हानीबद्दल, विशेषतः जीवित हानीचे मला मोठे दुःख आहे. तेथे सुरू असलेल्या मदतकार्यासाठी मी माझी मॅच फी देत आहे आणि इतरांनीसुद्धा मदतीसाठी पुढे यावे, असे मी आवाहन करतो.
त्याआधीसुद्धा रविवारी त्याने या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले होते. त्यावेळच्या आपल्या संदेशात त्याने म्हटले होते की, उत्तराखंडमधील महापुरात आपल्या कुटंबीयांना गमावलेल्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कुटुंबांसाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. या ठिकाणी सुरू असलेल्या मदतकार्याची संकटात सापडलेल्यांना मदत होईल, अशी मी आशा करतो.