गणेशोत्सवाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची महती तर किर्तन-भारूडातून पाणी बचतीचा संदेश

गणेशोत्सवाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची महती आणि किर्तन-भारूडाद्वारे पाणी बचतीचा संदेश आझादनगर मधील जयभवानी मित्रमंडळानं दिला आहे. गेली ३२ वर्ष गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा मंडळानं जपला आहे. यंदा जलसंवर्धन काळाची गरज हा विषय मांडताना सुश्राव्य किर्तन-भारूडाची चलचित्र दाखवून पाण्याचा प्रश्न ज्वलंत केला आहे. अवघ्या काही हजार रूपयांमध्ये उभारण्यात आलेल्या या देखाव्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते गेले ४५ दिवस राबत होते. वाढत्या नागरिकरणामुळे शहरं अस्ताव्यस्त वाढली आहेत. मानवी जीवनात पाण्याला अत्यंत महत्व असून पिण्याचं गोड पाणी अवघे ३ टक्के आहे.
त्यामुळं लोकसंख्येच्या वाढीत पुढील काळात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळं जलसंवर्धन ही काळाची गरज असून याची प्रचिती देणारा सृजनशील देखावा जयभवानी मित्रमंडळानं साकारला आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता जनजागृती करण्यासाठी नागरिकांच्या वाईट सवयींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मंडळानं भव्यदिव्य गणेश मूर्तीचा हव्यास टाळून शाडूची छोटीच पण सुबक मूर्ती बसवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जलसंवर्धनाचा संदेश देताना धबधबा, पाण्याच्या स्त्रोतांची चलचित्रं देखावा जिवंत करतात. याचबरोबर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसह नदीजोड प्रकल्पाची माहितीही निवेदनातून देण्यात आली आहे.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.