Health & FitnessMaharashtra Govमुंबई

पवारांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यानेच कोविड केंद्रासाठी सक्ती

मुंबई : कराड येथे 9 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार साखर कारखान्यांनी शंभर खाटांचे केअर सेंटर उभारावे अशी सूचना केली होती. आर्थिक अडचणीत असल्याने साखर कारखान्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केले. प्रत्येक जिल्ह्यातील काही मोजक्याच कारखान्यांनी तयारी दर्शवली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागात अपुऱ्या सुविधा मिळत असल्याने आता प्रत्येक साखर कारखान्यासाठी कोविड सेंटर उभारणे सक्तीचे करण्यात येणार आहे. अनेक साखर कारखान्यांनी अद्याप कोविड सेंटर उभारणीबाबतचे प्रस्ताव शासनाला सादर केलेले नाहीत. त्यामुळे शासनाने आता या साखर कारखान्यांना सक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राज्यात सध्या चालू स्थितीत असलेले एकूण 176 साखर कारखाने आहेत. या प्रत्येक साखर कारखान्याने प्रत्येकी किमान शंभर खाटांचे रुग्णालय उभारले तरी 17 हजारहून अधिक रुग्णांच्या उपचाराची सोय होऊ शकते. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू व्हायला अजून किमान तीन-चार महिन्यांचा अवकाश आहे. शिवाय प्रत्येक साखर कारखान्याची किमान एक-दोन गोदामे तरी सध्या मोकळी असणार आहेत. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांच्या नेहमीच्या वापरातील किंवा गाळप हंगाम काळातील वापराच्या काही इमारतीही मोकळ्या असणार आहेत. अशा ठिकाणी किमान शंभर किंवा त्याहून जादा खाटांचे कोविड सेंटर तातडीने उभारणे सहज शक्य आहे. प्रत्येक साखर कारखान्याने तसे केल्यास राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक-दोन कोविड सेंटर्स उभारली जाऊ शकतात. कोविड सेंटर नसणार्‍या साखर कारखान्यांचा गाळप परवानाही प्रसंगी प्रलंबित ठेवण्यात येणार आहे. तशा सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने साखर आयुक्तांना केल्या आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button