FeaturedMaharashtra Govमुंबईराजकारण

जास्तीत जास्त उद्योग यावेत याचे धोरण आखण्यात उशीर का ? – आशिष शेलार

मुंबई : कोरोनामुळे अनेक देशांमधील, मुख्यतः चीनमधील उद्योग बाहेर जात आहेत. हे उद्योग आपल्या राज्यात यावेत यासाठी उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक व इतर राज्यांनी उद्योग- श्रम कायद्यात उद्योगानुकूल बदल केले आहेत. महाराष्ट्रात मात्र तशा काही हालचाली झाल्या नाहीत. याबाबत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्रांना पत्र लिहिले आहे.

 

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की – कोरोनामुळे जगात बदललेल्या औद्योगिक परिस्थितीत अन्य देशातील उद्योग आपल्या महाराष्ट्रात जास्तीतजास्त यावेत याचे धोरण तयार करण्यात महाराष्ट्राला उशीर का होतो आहे?

कोरोनाशी संघर्ष करतानाच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या या विषयाकडे लक्ष द्या, असे पत्र मी आज मुख्यमंत्र्यांना दिले.

Image

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button