पश्चिम रेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर, गाड्यांच्या ७०० फेऱ्या वाढवणार
मुंबई: राज्यातील अनलॉकला सुरुवात झाली आहेच. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर आता पश्चिम रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या ७०० पर्यंत वाढवली आहे. यात १० एसी गाड्यांचाही समावेश करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपासून या अधिकच्या विशेष फेऱ्या सुरु होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी गर्दी करावी लागणार नाही आहे.
सामाजिक प्रोटोकॉल बनाये रखने और भीड़भाड़ से बचने के लिए, पश्चिम रेलवे ने 15 अक्टूबर 2020 से दैनिक विशेष उपनगरीय सेवाओं की संख्या 506 से बढ़ाकर 700 करने का निर्णय लिया है।
राज्य सरकार द्वारा अनुमति प्राप्त विशिष्ट श्रेणियों के व्यक्ति ही यात्रा करें। #WRUpdate pic.twitter.com/nxNzoxF0VZ
— Western Railway (@WesternRly) October 13, 2020
पश्चिम मार्गावर याआधी 506 फेऱ्या सुरु होत्या. आता त्या वाढून एकूण ७०० फेऱ्या होणार आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी मुंबईकरांना करावी लागणारी गर्दी काही प्रमाणात कमी होणार आहे. तसेच गाड्यांची फ्रिक्वेन्सी देखील वाढणार आहे. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकले प्रवास करताना गर्दी टाळून शारीरिक अंतर पाळणे आणि मास्कचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने दैनंदिन प्रवासात होणारी गर्दी आणि त्यातून संसर्गाचा वाढणारा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.