आम्ही राम मंदिर लढ्यातले स्वातंत्र्यसैनिक आहोत : संजय राऊत
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाष्य केले. राम मंदिर भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून वादंग पेटले आहे.
आयोजकांनी राम मंदिराच्या लढ्यामध्ये ज्यांचे योगदान आहे, त्यांना बोलवायला पाहिजे. बाबरी पाडल्याचा जो खटला आहे, त्यात शिवसेनेचे लोक आजही आरोपी आहेत. म्हणजे त्यादृष्टीने आम्ही राम मंदिर लढ्यातले स्वातंत्र्यसैनिक आहोत, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळेस मांडली. बिबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते.
राम मंदिर लढ्यातलं योगदान मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जेव्हा भलेभले ‘आम्ही बाबरी पाडली नाही, शिवसेनेने केले, असे म्हणत पळून जात होते. तेव्हा आम्ही ठामपणे उभे राहिलो, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राम मंदिराच्या लढ्यात ज्यांचा कसलाच संबंध नव्हता.अशा व्यक्तींना भूमीपूजनाचं आमंत्रण आहे. लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढलीच नसती तर पुढचे रामायण घडलंच नसते, असे म्हणत राऊतांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली आहे.
मात्र उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यानं अशा स्थितीत अट्टाहास करु नये असे आमचं ठरले आहे. मात्र भविष्यात उद्धव ठाकरे नक्कीच राम मंदिरात जातील, असेही राऊतांनी सांगितले.

