एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण – आशिष शेलार
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत घेऊन उत्तर दिले. देण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या मदतीचे केलेले दावे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व परिवहन मंत्री अनिल परब या तीन मंत्र्यांनी फेटाळले. यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी, एकास तीन हे तर भित्रे,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको असा टोमणा मारला. शेलार यांनी एकामागोमाग ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली.एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला "आघाडीची तीन माणसं" धावली.घाबरताय कशाला?तुमचं अपयश,नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको! 1/8
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
“विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर एवढी का कळ पोटात गेली?. एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला “आघाडीची तीन माणसं” धावली. घाबरताय कशाला? तुमचे अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा, रडून नको!,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचे, आभासी चित्र निर्माण करणाऱ्या आघाडीच्या”तीन माणसांच्या” दाव्यांचा पर्दाफाश पत्रकारांनी त्याच जागी केला. पत्रकरांच्या पहिल्या प्रश्नातच मुंबईतील अपयश उघडे झाले आणि “तीन माणसं” एकमेकाकडे बघत बसले! आभासी फुगा जागीच फोडणाऱ्या पत्रकारांचे आभार.आघाडीची “तीन माणसं” बोलली की रडली..? करोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरू आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. आधी विरोधी पक्षाच्या नावाने.. आता थांबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. करोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका,” असे आशिष शेलार यांनी सुनावले
आघाडीची "तीन माणसं" बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका!! 3/8
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
तथाकथित अर्थतज्ज्ञ @Jayant_R_Patil हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले…पण किती रडणार? खोटं किती बोलणार?अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडंवा ना..कुणी रोखलंय तुम्हाला..उगाच पावटे खाल्या सारखे का वागताय?दुर्गंधी का सोडताय?
"त्यांना"जमत नसेल "तुम्ही" करुन दाखवा! 4/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
“तथाकथित अर्थतज्ज्ञ जयंत पाटील हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले…पण किती रडणार? खोटं किती बोलणार? अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडवा ना..कुणी रोखलंय तुम्हाला..उगाच पावटे खाल्या सारखे का वागताय? दुर्गंधी का सोडताय? “त्यांना”जमत नसेल “तुम्ही” करुन दाखवा,” असं आव्हान आशिष शेलार यांनी दिले आहे.
महाराष्ट्र द्रोही तर तुम्ही आहात..तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करतेय..महाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिप्ट सीटी महाराष्ट्राने गमावली..सांगली ऐवजी अफ्रिकेत ऊस पिकवणे हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय?
आता उद्योग महाराष्ट्रात येऊ नयेच असे का वागताय? 5/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
“महाराष्ट्रद्रोही तर तुम्ही आहात. तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करतेय. महाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिफ्ट सिटी महाराष्ट्राने गमावली. सांगली ऐवजी अफ्रिकेत ऊस पिकवणे हा महाराष्ट्रद्रोह नव्हे काय? आता उद्योग महाराष्ट्रात येऊ नयेच असे का वागताय?,” अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली.
गेली 20 वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार देत आहात..@advanilparab हा आभास नाही सत्य!
आभासी रडू नका,या सत्यावर बोला!
मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत?त्याचं उत्तर द्या! 6/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
“गेली २० वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे ३३ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार देत आहात. अनिल परबजी हा आभास नाही सत्य! आभासी रडू नका,या सत्यावर बोला! मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत? त्याचं उत्तर द्या! “आघाडीची तीन माणसं” बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत.. खाटा नाहीत, डॉक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत. त्याचे काय ते सांगा.. सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला,” असंही आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
"आघाडीची तीन माणसं" बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत.. खाटा नाहीत, डाँक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत.. त्याचे काय ते सांगा.. सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला! 7/8
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
“आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली. पळकुटी भूमिका आज पण दिसली. काँग्रेस पळून दाखवतेय… किमान बाकीच्यांनी रडून नको करून दाखवा,” असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली.
पळकुटी भूमिका आज पण दिसली!काँग्रेस पळुन दाखवतेय… किमान
बाकीच्यांनी रडून नको करून दाखवा! 8/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020


