Health & Fitnessआरोग्य

राज्यात आज १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई: राज्यात आज (४ ऑक्टोबर) बऱ्याच दिवसांनंतर १५ हजारांच्या आत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात आज १३,७०२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आजही बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज १५,०४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

सध्या राज्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १४,४३,४०९ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ३८,०८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ११,४९,६०३ रुग्णांने आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रिकव्हरी रेट ७९.६४ टक्के इतका झाला आहे. तर मुंबईत आज २१०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button