SangliSataraकोल्हापूर

अलमट्टी धरणातून 50हजार क्यूसेक प्रवाह वाढवला

बेळगाव : कोल्हापूर, सांगली  आणि सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रासह होत असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यास सांगितले. त्यानुसार ५० हजार क्यूसेक वाढवून सोमवारी अडीच लाख क्यूसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला.

दरवर्षीचा अनुभव पाहता शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडतो. गेल्या तीन दिवसातील संततधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दक्षता घेत मंत्री यड्रावकार यांनी बेळगावचे पालकमंत्री जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अलमट्टीतून विसर्ग वाढविण्याची विनंती केली. त्यानुसार दोन लाख क्यूसेक वरून अडीच लाख क्यूसेक विसर्ग वाढविण्यात आला. दरम्यान, मंत्री यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, तेरवाड बंधारा, राजापूर बंधारा येथे भेट देऊन पुरस्थितीची पाहणी केली. राजापूर बंधारा – एक लाख २७ हजार ५०० क्यूसेक विसर्ग ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

एक लाख २७ हजार ५०० क्यूसेक विसर्ग ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. त्यानुसार विसर्ग सुरू ठेवण्यात आला. या बंधाऱ्यावर सोमवारी दुपारी पाणी पातळी ४३ फुटावर स्थिर राहिली. येथील इशारा पातळी ५३ फूट तर ५८ फूट इतकी आहे. ग्रामसेवक तलाठ्यांना गावातच थांबण्याचे आदेश सद्यस्थितीत शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. तरीही संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दक्षता घेत ग्रामसेवक व तलाठी यांना गावातच थांबण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button