मुंबई: फेम इंडिया – एशिया पोस्ट या प्रसिद्ध नियतकालिकातर्फे करण्यात आलेल्या 50 उम्दा विधायक सर्व्हे 2020 अर्थात देशातील 50 उत्कृष्ट आमदारांचा विविध श्रेणीत केलेल्या सर्व्हेत आपल्या मतदारसंघात 24×7 कार्यरत असणाऱ्या
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड.आशिष शेलार यांची देशातील सर्वात उत्कृष्ट आमदार म्हणून निवड करण्यात आली आहे.
सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आमदार आशिष शेलार यांनी विद्यार्थी परिषद, भाजपा युवा मोर्चा आणि त्यानंतर मुंबई महापालिकेत 2 टर्म नगरसेवक, विधान परिषदेचे आमदार आणि त्यानंतर वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून दोन वेळा विक्रमी मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे.
मुंबईतील गिरणगावात जन्मलेल्या आमदार आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम या पारंपारिक काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला टक्कर देत भाजपचा गड उभा केला. 24×7 आपल्या मतदारसंघात कार्यरत असणारे ऊन ,वारा पाऊस याची तमा न बाळगता काम करणारे आमदार आशिष शेलार यांचे मतदारसंघातील अनेक उपक्रम हे लक्षवेधी ठरले आहेत. वांद्रे पश्चिम म्हणजेच खार पश्चिम सांताक्रुज पश्चिम आणि वांद्रे पश्चिम हा संपूर्ण परिसर म्हणजेच माझे कुटुंब आहे,असे समजून अँड शेलार गेली अनेक वर्ष या भागात काम करत आहेत त्यातूनच त्यांचा दोन वेळा विधानसभेवर प्रचंड मताधिक्क्याने विजय झाला. दुसऱ्याच्या मदतीला सदैव धावून जाणारे, मतदार संघात जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा, साफसफाई पासून मतदारसंघाच्या सुशोभीकरण पर्यंत अनेक उपक्रम त्यांनी राबविले ते अत्यंत लक्षवेधी ठरले. कुठल्याही संकटात मतदारसंघातील प्रत्येकाच्या आणि सर्व धर्मीयांच्या सर्वात प्रथम पोहोचणारे मदत करणारे विद्यार्थ्यांपासून गरिबांपर्यंत रुग्णांपर्यंत प्रत्येकाला मदत करून प्रत्येकाच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच ते काम करत आहेत. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात त्यांची लोकप्रियता वाढत गेली.
सर्व धर्मीयांचे सण उत्सव यामध्ये सहभागी होऊन, हिरीरीने पुढाकार घेऊन खेळ,मनोरंजन, शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण प्रेमी अशा असंख्य उपक्रमाची रेलचेलच या विधानसभा मतदारसंघात वर्षभर सुरू राहते. मागील पाच वर्षाच्या काळात त्यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली असून वांद्रे पश्चिम मतदारसंघ आता झपाट्याने बदलत आहे.
त्यासोबतच त्यांनी सलग दोन टर्म भाजपाचे मुंबई अध्यक्षपद भूषवले आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबई मध्ये भाजपने गरुड झेप घेतली. चोवीस नगरसेवक असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपचे 83 नगरसेवक निवडून आले. मुंबईमध्ये दोन लोकसभा, दोन विधानसभांच्या निवडणुका आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात झाल्या..पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमित भाई शहा यांचा आशीर्वाद यामुळे मुंबईमध्ये पक्ष वाढवून पक्षाचा दणदणीत विजय पताका फडकवण्यात अँड आशिष शेलार यांना यश आले. महाराष्ट्र सरकार मध्ये त्यांना शालेय शिक्षण मंत्री या पदावर काम करता आले तर सध्या विधानसभेत ते मुख्य प्रतोद म्हणून काम करत आहेत.
दांडगा जनसंपर्क प्रचंड मेहनत करण्याची ताकद, हुषार, अभ्यास यातून पक्षाचा सर्वसमावेशक चेहरा, तरुण तडफदार अभ्यासू आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख राजकीय वर्तुळात आता तयार झाली आहे. राजकारणा सोबतच क्रिकेट, फुटबॉल दोरी उड्या, साहित्य, कला,संगीत या क्षेत्रातील त्यांचा वावर सदैव आहेतच. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. त्यामुळे प्रचंड परिश्रमाने आणि मेहनतीने आमदार अँड आशिष शेलार यांनी हे विश्व उभे केले त्यामुळेच त्यांचा या पुरस्काराच्या निमित्ताने यथोचित सन्मान झाला आहे. यापूर्वी लोकमत समूहाने उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुध्दा सन्मानित केले होते.
https://thefameindia.com/Fame-India-Asia-post-nice-mla-Survey-2020


