मुख्यमंत्री ठाकरेंचा सन्मान व राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात! – भाजपा
मुंबईः विधानपरिष निवडणुकीमुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी मतदान होणार माहे. मात्र, महाविकास आघाडीत जागावाटपावरून कुरबुरी सुरू आहे. या वादात भाजपाकडे बोट दाखवणा-यांना भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात! ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही यावरून आघाडीत जो बेबनाव सुरु आहे त्यामधे आम्हाला ओढू नका!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 10, 2020
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात! ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही, यावरून आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका!,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
निवडणूका बिनविरोध करणे ही विरोधी पक्षाची जबाबदारी हा जावई शोध लावू नका…! pic.twitter.com/Vik2PngOym
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 10, 2020


