Maharashtra Govमुंबई

‘मिशन बिगीन अगेन’चा तिसरा टप्पा आजपासून

मुंबई : ठाकरे सरकारच्या ‘पुनश्च हरि ओम’ अर्थात ‘मिशन बिगीन अगेन’चा तिसरा टप्पा आजपासून (सोमवार ८ जून) सुरु होत आहे. मिशेन बिगेन अंतर्गत राज्यात तब्बल ७५ दिवसांनी आजपासून खाजगी कार्यालये १० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू होत आहेत. तर शासकीय कार्यालयातील उपस्थितीही आजपासून वाढणार आहे. दुसरीकडे विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा शिक्षणासाठी बंदच राहणार आहेत. मात्र उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी आणि ऑनलाईन शिक्षणासाठी शाळा आजपासून सुरू होणार आहेत.

ज्या कार्यालयांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात तिथे १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीस परवानगी आहे. उरलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य सरकारने खासगी ऑफिस सुरू करायला परवानगी दिली आहे. कामाच्या ठिकाणी सगळी जबाबदारी घेण्याच्या सूचनाही सरकारने केल्या आहेत. याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आठवड्यातला एक दिवस कामावर उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. एकही दिवस कामावर हजर न झालेल्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संपूर्ण आठवड्याचा पगार कापला जाईल, असा इशारा सरकारने आधीच दिला आहे.

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, विविध शिकवणी वर्ग बंद. लोकल वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद. केशकर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद. स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी नसलेल्या रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह आणि तत्सम इतर ठिकाणे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून) आंतरराष्ट्रीय सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या समारंभांवर बंदी असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button