Finance
भारताची अर्थव्यवस्था ०.४ टक्क्याने सुधारली !
दिल्ली: शुक्रवारी सकाळी स्टॉक मार्केट मध्ये शेयर घसरल्याची बातमी आली. लोकांचे त्या सकाळच्या तासात बरेच नुकसान झाले आणि आज स्टॉक मार्केट साठी काळा दिवस ठरतो का काय अशी शक्यता लोकांना दिसू लागली. कोरोनाचे संकट देशातून जाताच होते तरीही परत एकदा ते उसळून वर आले आहे. या संकटातुन जी आर्थिक हानी झाली झाली तीही काही कमी नव्हती. आता ही अर्थव्यवस्था थोडीफार का होईना सुधारतेय असे बोलण्यास हरकत नाही.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत आर्थिक विकास दर वाढला आहे. सलग दोन तिमाहीतील उणे विकासाची मरगळ झटकत अर्थव्यवस्थेने ०.४ टक्के विकासदर नोंदवला आहे. त्यामुळे तंत्रिकदृष्ट्या मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची सुटका झाल्याचे बोलले जात आहे.
भारत सरकारने काढलेल्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी ३६.२२ लाख कोटींपर्यंत वाढला. गेल्या वर्षी तो ३६. ०८ लाख कोटींपर्यंत होता. म्हणजेच २०२०-२०२१ मध्ये अंदाजे हा फरक ८ टक्क्यांचा असेल. २०१९- २०२० च्या अनुमानानुसार जीडीपी हा ४ टक्क्यांवर होता. निर्याती मध्ये वाढ होत असल्याने असे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. कारखान्यातील निर्यातीत वाढ होत आहे म्हणूनच उत्पादनात दरमहा सुधारणा होत आहे.
केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात २०२१-२२ या वर्षात विकासदर ११ टक्के राहील, असा महत्वकांक्षी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेनं देखील याच वर्षासाठी १०.५ टक्के जीडीपीचा अंदाज वर्तवला आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीए २०२१ मध्ये भारताचा विकासदर ११.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
