उन्नाव मध्ये २ दलित मुलींचा मृत्यू ! तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक !
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी रात्री तीन अल्पवयीन दलित मुली चारा घेण्यासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांना शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर दोन मुलींचा रुग्णालयात मृत्यू झाला तर तिसर्या मुलीला विषबाधा झाल्याचा दावा केला आहे आणि सध्या तिच्या मृत्यूशी ती झुंज देत आहे.
उन्नाव चे पोलीस आयुक्त आनंद कुलकर्णी म्हणाले आहेत की, “दोन मुलींचा रुग्णालयात मृत्यू झाला तर एकीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. प्राथमिक माहितीनुसार मुली गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. डॉक्टर सांगतात की विषबाधा होण्याची लक्षणे देखील आहेत. चौकशी सुरू आहे.”
मुलींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे, तर पोलिस मृत्यूचे कारण विषबाधा आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी पोस्टमाॅर्टमच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत. पोलिस ग्रामस्थ आणि तीन मुलींच्या कुटूंबाची चौकशी करत आहेत. घटना शेतात घडल्यामुळे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. पीडित मुलीच्या एका आईने पोलिसांना सांगितले होते की तिच्या तोंडातून फेस येत आहे. तिचे कपडे चांगले दिसले आणि गळपट्टा देखील गळ्यास बांधलेला आढळला. हात पाय बांधलेले नसल्याचेही आईने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात दलितांवरील होणार्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे यामुळे देशभरात याचा भडका उडाला आहे. दलित गट आणि भीम आर्मी प्रमुख चंद्र शेखर आझाद यांनी अशी मागणी केली आहे की, जगण्याची धडपड करणाऱ्या तिसऱ्या मुलीसाठी त्वरित चांगल्या उपचारांसाठी एम्स-दिल्ली येथे हलविण्यात यावी पण तिसरी मुलगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने तिला एम्स-दिल्ली येथे हलविण्याची तातडीची योजना नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.