आरोग्यमुंबई

मुंबईतील केईएम रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे तरुणीचा मृत्यु

पावसाळा आला की सातत्याने नागरिकांना स्वाईनफ्लू, डेंगू, मलेरिया असे अनेक आजारांचा त्रास सहन करावा लागतो. स्वाईनफ्लूमुळे शनिवारी केईएम रुग्णालयात एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यु झाला. गोवंडी येथे राहणाऱ्या दानिश्ता खानला ८ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला लेप्टोचीही लागण झाली असून तिच्यावर एमआयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच १३ जुलै रोजी शनिवारी रात्री तिचा मृत्यु झाला.

राज्यातील स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७४५ असून, सध्या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण ८६ आहेत. यात उपचार करून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १,४७० इतकी आहे. तसेच राज्यात जानेवारीपासून १९१ जणांचा आणि मुंबईत चार जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button