LokSabhaRailwaysलाइफस्टाइल

रेल्वेच्या समस्या मांडण्याकरिता डॉ. श्रीकांत शिंदे रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला

नवी दिल्ली: रेल्वे मुंबईची जीवनरेखा मानली जाते. परंतु रेल्वेच्या समस्या या दिवसेंदिवस वाढत असून त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. रेल्वेच्या या समस्यांकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात आवाज उठविला. दररोज ४२ लाख, ५० हजार प्रवासी मध्य रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि ट्रांस हार्बरवर प्रवास करतात. रेल्वेच्या रोज १७७२ फेऱ्या या उपनगरीय रेल्वे लाइन वर चालतात. गेले महिनाभर रेल्वे सेवेत जवळपास रोज बिघाड होत आहे त्यामुळे प्रवाशांना दररोज ऑफिसला पोहोचायला विलंब होतो आणि नाहक लेट मार्क लागतो असे डॉ. शिंदे म्हणाले.

उपनगरी रेल्वे सेवेचा वारंवार बोजवारा उडत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची भीती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात व्यक्त केली. रेल्वेच्या नालेसफाईसंदर्भात गेली अनेक वर्षे सातत्याने शंका उपस्थित होत असुन पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी रुळांपासून दहा मीटर अंतरावर संरक्षक भिंत बांधण्याची मागणीदेखील डॉ. शिंदे यांनी केली. तसेच या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेटही घेतली.

रेल्वे सेवा ही कल्याण संसदीय क्षेत्राची जीवनरेषा आहे. परंतू गेल्या काही वर्षांपासून या सेवेत सतत काही ना काही बिघाड होत आहेत. कधी रेल्वे रुळांमध्ये काही समस्या तर कधी पेंटाग्राफ मध्ये बिघाड तर कधी सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड. थंडी आणि पावसात रेल्वेमध्ये बिघाड हि आता नित्याचीच बाब झाली आहे. सातत्याने चालणारी रेल्वे सेवा या वर्षीही अनुत्तीर्ण झाली आहे असेही प्रतिपादन डॉ. शिंदे यांनी केले.

दररोज ४२ लाख, ५० हजार प्रवासी मध्य रेल्वेच्या मुख्य (सेन्ट्रल) हार्बर और ट्रांस हार्बर वर प्रवास करतात. रेल्वेच्या रोज १७७२ फेऱ्या या उपनगरीय रेल्वे लाइन वर चालतात. गेले महिनाभर रेल्वे सेवेत जवळपास रोज बिघाड होत आहे. प्रवाश्यांना दररोज ऑफिसला पोहोचायला विलंब होतो आणि नाहक लेट मार्क लागतो असेही डॉ. शिंदे म्हणाले.

वर्षभरात रेल्वेचे ५२ दिवस मेगाब्लॉक असतात. तरीसुद्धा उपनगरीय रेल्वे वेळेवर धावत नाही. डॉ. शिंदे यांनी रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले की, उपनगरीय रेल्वेपासून सर्वात जास्त महसूल मिळूनही उपनगरीय रेल्वेत सर्वात जास्त समस्या आहेत. आठवड्याला पाच वेळा वेळापत्रक बिघडलेले असते आणि त्याचा फटका रोज लाखो लोकांना बसतो अशी माहीतीही डॉ. शिंदे यांनी दिली

कल्याण मुंबई उपनगरी मार्गावर सेवेचा खोळंबा झाल्यास झाल्यास विनाविलंब जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावर अथवा धीम्या गाड्या जलद मार्गावर आणाव्यात, तसेच पाणी जिथे जास्त जमते तिकडे अधिक अश्वशक्तीचे पंप लावून पाणी काढायची सुविधा असावी तसेच कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कर्जत-कसारा मार्गावर जादा लोकल उपलब्ध असाव्यात अशीही मागणी डॉ. शिंदे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button