Maharashtra GovPoliticsShivSena-Congress-NCPमुंबईराजकारण

मातोश्रीनंतर आता वर्षा बंगला, शरद पवार यांच्याकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली आहे. ही बैठक महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत होती की लॉकडाउनसंदर्भात यावरून आता राजकीय चर्चा रंगल्या आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन कसा असावा याबाबत राज्याला अनेक आधिकार दिले आहेत. राज्यातील लॉकडाउनमध्ये टप्पाटप्प्याने सूट देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतं आहे.

राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध अधिक शिथिल करण्याबाबत सत्ताधारी महाविकास आघाडीत मतभेद कायम असल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात जास्तीत जास्त सवलती देण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली जात असली तरी मुख्यमंत्री मात्र कठोर निर्बंध कायम ठेवण्यावर ठाम असल्याचे समजते.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी रात्री चर्चा झाली. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्यत्र दुकाने काही काळ उघडण्यास परवानगी द्यावी, तसेच उद्योगधंदे सुरू व्हावेत, अशी पवारांची भूमिका आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी पवारांची मागणी असल्याचे समजते.

दरम्यान, यापूर्वी शरद पवार यांनी स्वतः मातोश्रीवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते संजय राऊत देखील होते. राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती. त्यामुळे त्या भेटीबद्दलही मोठी चर्चा झाली होती. आता पवारांनी वर्ष बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button