गरिब कल्याण रोजगार अभियानाचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोप विरोधी पक्ष करत असतात. मोदींनी प्रचारसभांमध्ये दोन कोटी रोजगार निर्मितीचे स्वप्ण दाखवले होते प्रत्यक्षात मात्र, त्यांच्या काळातच अधिक बेरोजगारी वाढल्याच्या विरोधकांच्या टीकेला सरकारने, ईपीएफची आकडेवारी जाहीर करत रोजगारनिर्मित्ती झाल्याचं अनेकदा सांगितलं आहे. मात्र, आता गरिब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 20 जून रोजी या योजनेचं उद्घाटन होणार आहे.
ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम देण्याचं लक्ष्य ठेऊन पंतप्रधान मोदींकडून 20 जून रोजी गरिब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे या योजनेचं उद्घाटन होणार आहे. बिहारच्या खागरिया जिल्ह्यातील तेलीहार या खेड्यातून या योजनेला सुरुवात होईल.
या योजनेचा स्थलांतरीतांना फायदा होणार आहे. स्थलांतरीतांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना आहे.
देशाच्या 6 राज्यातील 116 जिल्ह्यांतील गावांमध्ये ही योजनेच्या माध्यमातून रोजगारनिर्मित्ती होईल. या योजनेतून 25 विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतील. तर, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि ओडिशा या राज्यातील स्थलांतरीत नागरिकांना रोजगार देण्याचं काम प्राथमिक स्तरावर होणार आहे. त्यामध्ये जवळपास 25 हजार स्थलांतरीतांना काम मिळेल. पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

