Health & Fitnessआरोग्य

‘या’ जीवनसत्वाची कमतरता ठरू शकते घातक!

मुंबई: कोरोनामुळे लोकांना घरगुती जेवण आणि त्यातून मिळणारी पोषकद्रव्ये यांचे महत्व या लॉकडाऊनमुळे कळले आहे. तसेच शरीरातील रोगप्रतिकार शक्ती एखाद्या विषाणू विरोधात लढण्यासाठी किती महत्वाची असते हे देखील समजले आहे.

शास्त्रज्ञांनी एका अहवालात असे सांगितले आहे की वयवर्षे १८ ते ३० यातील भारतीय लोकांना विटामिन डी ची कमतरता आहे. मे २०२० मध्ये एक राष्ट्रव्यापी अहवाल सादर करण्यात आला. त्यात असे नोंदवण्यात आलेले की चाचणी झालेल्या लोकसंख्येपैकी ७७ टक्के लोकांना विटामिन डी ची कमतरता दिसून आली. यातील १८ ते ३० वयातील व्यक्तींचे प्रमाण हे ८१. २ टक्के एवढे होते.

हे प्रमाण भारताच्या उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व या भागात सारखेच आहे. जालंधर येथील गार्डियन रुग्णालयातील ओर्थोपेडिक तज्ञ तसेच इंटरनॅशनल जनरल ऑफ रिसर्च ओर्थोपेडिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झलेल्या अभ्यास अहवालाचे लेखक डॉक्टर. संजीव गोयल यांनी सांगितले. विटामिन डी च्या कमतरतेकडे लोक हे खूप दुर्लक्ष करतात पण स्नायू आणि हाडांसाठी हे जीवनसत्व खूप महत्वाचे आहे.

या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे लहान मुलांना मूडदुस होऊ शकतो, प्रौढांमध्ये ओस्थियोपोरोसीसचा धोका वाढतो. तसेच कार्डिऒव्हॅस्क्यूलर आजार, मधुमेह, हायपर टेन्शन आणि संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button