Maharashtra GovPoliticsShivSena-Congress-NCPमुंबईराजकारण

तीन पक्षाचे सरकार त्यामुळे सर्वांना सामान संधी मिळाली पाहिजे

मुंबई : राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली . मात्र आता आघाडी सरकार मधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.विकास निधी वाटपाच्या असमतोलाच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा काँग्रेस आमदारांनी दिला होता . यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार नाराज असल्याचे मान्य केले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी आमदारांच्या नाराजीबद्दल एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली ‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यात सुधारणा करू असे स्वतः मुख्यमंत्री मला म्हणाले आहेत. यासंदर्भात आमदारांशी बोलून त्यांचा आम्ही समाधान करू’, असे थोरात म्हणाले.

‘तिन्ही पक्षांचे मिळून 171 आमदार आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी आपआपल्या मतदारसंघात राहुन काम करणे गरजे आहे आणि आमदारांना काय लागते काय नाही, हे जाणून घेणे आणि त्यांना मदत करणे याची जबाबदारी आमच्या सरकारवर आहे. काही आमदारांमध्ये नाराजी आहे ती आम्ही बोलून घालवू’ असंही थोरात यांनी सांगितले.

त्याचबरोबर, आपआपल्या मतदारसंघात काम करत असताना काही पक्षातील आमदारांना जास्त निधी मिळाला आहे तर काहींना कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, यात सर्वांनाच निधी मिळाला असेही नाही. आमचे आमदार हे नाराज नाही, पण कामाबद्दल अपेक्षा आहे, असेही थोरातांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार हे तिन्ही पक्षाचे सरकार आहे . मात्र आघाडीत पक्षपात होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे . विकास निधीचे समान वितरण होत नसून सरकारमध्ये राष्ट्रवादीला झुकते माप मिळते. त्यामुळे विकास निधीवर राष्ट्रवादीने डल्ला मारला, असे काँग्रेस आमदारांचचे म्हणणे आहे. त्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा काँग्रेसच्या ११ आमदारांनी दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button