मोदींवर टीका करणे टाळा , काँग्रेस सांभाळा ; शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसमधील त्यांचे अनुभव व्यक्त केले. ते म्हणाले, काँग्रेससाठी गांधीवाद एक मजबूत शक्ती आहे. तसेच पंतप्रधान मोदींवर टीका करणे थांबवायला हवे, ही वेळ काँग्रेसचे काम सांभाळायची आहे, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला .
मी अनेक वर्षांपासून काँग्रेसला बघत आलो आहे. आणि यातून एक गोष्ट मला दिसून येते. कोणी याचा स्वीकार करेल किंवा नाही..मात्र गांधीवाद काँग्रेससाठी मोठी ताकद आहे.
सोनिया गांधी काँग्रेसला एकत्र आणण्यात यशस्वी राहिल्या. आता काँग्रेसवर विश्वास असणाऱ्यांनी राहुल गांधी यांचा स्विकार केला आहे. मला वाटतं की सर्वांनी पक्षाची पूर्ण जबाबदारी राहुल गांधींवर सोपवायला हवी. ते पुढे म्हणाले राहुल गांधी यांनी पक्षाचं शासन सांभाळणे म्हणत्त्वपूर्ण आहेच.. आणि पक्षाच्या विविध नेत्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे. ते म्हणाले – सर्व नेत्यांशी बोलायला हवे …त्यांना एकत्र आणायला हवे, असेही पवार म्हणाले .
काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी ट्विट केले होते की, पंतप्रधान आपली प्रतीमा तयार करण्यासाठी 100 टक्के लक्ष केंद्रीत करीत आहेत. भारतातील सर्व नियंत्रित संस्थानं या कामात व्यस्त आहेत. यावर शरद पवार यांनी राहुल गांधींना सल्ला दिला..ते म्हणाले – हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. मात्र आपण पाहिलं आहे की जेव्हा तुम्ही कोणा एका व्यक्तीला वैयक्तिक लक्ष्य करता तेव्हा आपली विश्वासार्हता कमी होत जाते. हे टाळायला हवं, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले .

