मुंबईशिक्षण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका, मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयुक्तांच्या आदेशांनुसार मुंबईत या वर्षाअखेरपर्यंत शाळा बंदच राहतील.

येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मात्र मुंबईतील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरू होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत.

त्यानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहेत. राज्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर त्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा इशारा दिला गेला आहे. तर दुसरीकडे दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.

आता दिल्लीतील परिस्थिती पाहता ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची स्थिती जर वाढली तर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. काही वेळातच याबाबतच परिपत्रक पालिकेकडून जारी केले जाणार आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती जरी नियंत्रणात असली तरी येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने या वर्षाअखेरपर्यंत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत अचानक वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काहीच वेळात पालिका प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सविस्तर माहिती देण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button