मिठी नदीच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरण यासंबधित सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक संपन्न
मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकपनेतून मिठी नदीचे पुनर्जीवन करण्यात येणार असून नदीतुन जलवाहतूक सुरु करून त्याद्वारे रोजगारनिर्मिती होऊ शकेल असा दावा त्यांनी केला होता.

यासाठी नदीच्या किनाऱ्यावरील झोपडपट्टी हटवली गेली असून नदीच्या दोन्ही बाजूला भिंती, सायकल ट्रॅक, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम आणि इतर सुविधा देखील उभारल्या जातील असे ही आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या पाठपुराव्याने मिठी नदीचे काम सुरु झाले असून आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मिठी नदीच्या सुरु असलेल्या कामासंबंधित माहिती देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, UNEP चे माजी प्रमुख एरिक सोलहेम आणि अफरोज शाह आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.



