पालघर साधु हत्याकांड ; सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला विचारला जाब
मुंबई : लॉकडाऊनदरम्यान पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे एका जमावाकडून तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती त्यात दोन सांधूंचा समावेश होता. साधूंच्या हत्येचे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजले.विरोधकांच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाची गृहमंत्रालयाकडून दखल घेण्यात आली व हे प्रकरण थेट सुप्रिम कोर्टात पोहचले.
या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुप्रिम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारला फटकारले आहे. पुढील दोन आठवड्यात या प्रकरणाचा खुलासा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सबीआय चौकशी होण्यासाठी परवानगीदेखील दिली आहे.
साधूंच्या हत्त्या प्रककरणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारवरची तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर श्रद्धानंद सरस्वती आणि जूना आखाडाचे काही अन्य साधूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायपीठात ही सुनावणी झाली. या याचिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कथित सहभागाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एवढेच नाही तर, महाराष्ट्र पोलिसांनी जाणीवपूर्वक सखोल चौकशी केली नाही, असा दावा याचिकेत केला आहे.तर, दुस-या एका याचिकेत एनआयए चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, एनआयए चौकशीच्या दुस-या याचिकेवर सुनावणी झाली असून सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी जुलैच्या दुसर्या आठवड्यात होणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत 100 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

