मंत्री दृष्य झाले आता अदृश्य चौकशी दृष्य होईल का? मुख्यमंत्री बोलत नाहीत म्हणजे मुक सहमती आहे का?
-भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार
मुंबई: मंत्री संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एवढे दिवस मौन पाळले म्हणजे या सगळ्या प्रकरणात एका अर्थाने मुख्यमंत्र्यांची मूकसंमती आहे, असा समज होतो आहे, त्यांची खरंच मुकसहमती आहे का? असा सवाल भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला.
आमदार अँड आशिष शेलार यांनी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, गेले काही दिवस आम्ही पाहतो आहे की, गुन्ह्यापासून लोकांना वाचवण्यासाठी आमचे विरोधक काय-काय पद्धतीची ढाल पुढे करत आहेत. आता समाजाची ढाल पुढे केली जाते आहेे. तसेच एका समाजाबद्दल सुद्धा गैरसमज पसरवण्याचे काम केले जाते आहे.
गुन्ह्यातून वाचवण्यासाठी कुठे वय असेल, कुठे धर्म असेल, कुठे जात पुढे केली जाते आहेे. महाराष्ट्रात तर सत्ताधारी पक्ष हे करत आहेत. आज पर्यंत अदृश्य असलेले मंत्री संजय राठोड आज दृश्य स्वरूपात दिसले. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा सवाल आहे की,
मुख्यमंत्री महोदय अदृश्य मंत्री जसे दृश्य झाले तसे आता अदृश्य पद्धतीने तुमची सुरू केलेली चौकशी दृश्य स्वरूपात काही दिसणार आहे का?
मुख्यमंत्री महोदयांना थेट सवाल आहेत
1) चौकशी कुठल्या गुन्ह्या अंतर्गत केली जातेय?
2) या गुन्ह्याची नोंद क्राईम रिपोर्ट म्हणून झाली आहे का? की न नोंदवलेल्या
गुन्ह्या अंतर्गत चौकशी होते आहे?
3) चौकशी गेले दहा-बारा दिवस चालू आहे त्यात किती लोकांचे जवाब घेतले ?
4 ) या प्रकरणातील साक्षीदार हे संरक्षित आहेत का? साक्षीदारांना पळवणे साक्षीदारांना, धमकावणे अशा पद्धतीचा कारभार सत्तेत असलेले लोकच करतात की काय?
तसेच मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की,कोरोनामुळे या पुढे सार्वजनिक धार्मिक राजकीय कार्यक्रम करू नये. आम्ही ही करणार नाही. अशा पार्श्वभूमीवर सुद्धा मंत्री संजय राठोड यांचा सार्वजनिक जाहीर कार्यक्रम होतो कसा? त्याला परवानगी मिळते कशी मिळाली? तिथे गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमली त्याची गुप्तवार्ता विभागाला माहिती होती का? गुप्तवार्ता विभागाने मुद्दामून हेतुपुरस्सर केले?
या सगळ्या प्रश्नातून मुख्यमंत्र्यांची मुक संम्मती आहे का?असा समज होतो आहे.
अन्यथा आम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या!
उपमुख्यमंत्री थेट त्यां मंत्र्यांनीशी बोलत आहेत, त्यांच्याशी काय बोलतात याचे स्पष्टीकरण मात्र देत नाहीत. त्यामुळे सगळेच प्रकरण गुलदस्त्यात आहे.
लपवाछपवीचे काम केल जातंय
समाजाची ढाल केली जातेय पण ती पीडित महिला भगिनी सुध्दा त्याच समाजाची आहे. त्यामुळे एक मोठं कटकारस्थान केले जातेय. आज झालेला प्रकार म्हणजे पोलिस यंत्रणेवर आतापर्यंत राजकीय दबाव होता, आता पोलिस यंत्रणेवर आम्ही सामाजिक दबाव सुद्धा टाकू, हिम्मत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा पद्धतीचा संदेश दिला जातोय.
त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही मिळून या विषयात नेमकं काय घडलंय ते जनतेला सांगा असे आवाहन करतो, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी केले.