टॅक्सी आणि रिक्षाच्या दरात वाढ!
मुंबई : मुंबईत १ मार्चपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीसाठी अधिक प्रवास भाडे भरावे लागणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने (एमएमआरटीए) सोमवारी दोन्ही वाहनांसाठी किमान भाड्यात तीन रुपये भाडेवाढीला मान्यता दिली आणि टॅक्सी, भाडे अनुक्रमे 21 आणि 25 रुपयांवर आणले गेले आहे.
ऑटोरिक्षासाठी 1.5 कि.मी.चे किमान भाडे 18 रुपयांवरून वरून 21 रुपये होईल त्यानंतर, दर किलोमीटरचा दर सध्याच्या 12.19 रुपायांवरून 14.20 रुपयांपर्यंत जाईल. १ कि.मी. साठी किमान भाडे २२ रुपयांपेक्षा जास्त असेल.
राज्यातील परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, “दरवाढीची अंमलबजावणी १ मार्चपासून होईल. ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना मे पर्यंतचे मीटर कॅलिब्रेट करावे लागतील,” असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यानंतर, दर किलोमीटरचा दर सध्याच्या 12.19 रुपयांवरून 14.20 रुपयांपर्यंत जाईल. १ कि.मी. टॅक्सीसाठी किमान भाडे २२ रुपायांवरून २५ रुपये पर्यंत वाढेल.
याचदरम्यान, रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ झाल्याने मुंबई तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरवासीयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांसाठी मात्र ही दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा-टॅक्सी युनियनकडून ही मागणी करण्यात येत होती. ही मागणी सरकारला अखेर मान्य करावी लागली आहे.

