सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस कमी पडत होते ते दिसत होते, कारण सरकारलाच माहिती – संजय निरूपम
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी अखेर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सुरूवातीला बॉलिवूड नेपोटिझम असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सुशांतच्या वडीलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली त्यानंतर हे प्रकरण चिघळले व विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरले.
कॉंग्रेस राज्यात सत्तेत आहे. मात्र, कॉंग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नेहमीच शिवसेना विरोधात भूमिका घेतली आहे. आताही त्यांनी सरकारविरुद्ध भूमिका घेेत मुंबई पोलिसांनाच खडे बोल सुनावले आहेत. मुंबई पोलिसांनी अपात्र प्रतिष्ठेचा प्रश्न उद्भवू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुसरण करावे. असे संजय निरुपम म्हणाले तसेच, मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर कोणालाही शंका नाही, पण या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलीस कमी पडत होते हे स्पष्ट दिसून येत होते. याचे कारण सरकारच जाणो असेही संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
मुंबई पुलिस नाहक प्रतिष्ठा का प्रश्न ना बनाए।
सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करे।#SushanthSinghRajput की मृत्यू की जाँच #CBI को सौंप दे।
मुंबई पुलिस की क्षमता पर किसी को शक नहीं है।पर इस मामले की जाँच में ढीलाई बरती जा रही थी।यह दिख रहा था।कारण सरकार जाने।#CBIforShushant— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) August 19, 2020
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट बजावलं आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. असेही कोर्टाने म्हटले आहे.
या प्रकरणी 11 ऑगस्टला युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षकारांनी आपापली बाजू लेखी स्वरुपात संक्षिप्तरित्या मांडली होती. मग सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला. सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे.

