Featuredकला आणि साहित्यसांगली-मिरज-कुपवाड (Sangli, Miraj & Kupwad)

कर्नाटक मध्ये सापडला ९०० वर्षांपूर्वीचा शिलालेख !

सांगली : भारतात पुष्कळशा पौराणिक वास्तू आहेत तसेच भारताचा इतिहासही खूप जुना आहे. या मुळेच काहीना काही पुरातन वस्तू, लेणी, शिलालेख हे सापडतच असतात. कर्नाटक सीमेजवळ असलेल्या जत तालुक्यातील बालगाव येथे सुमारे ९०० वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला असून ‘ हळेकन्नड ‘ लिपीतील या १३ ओळींचा लेखामध्ये दान दिल्याचा उल्लेख आढळला असल्याचे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे प्राध्यापक. गौतम काटकर आणि मानसिंग कुमठेकर यांनी सांगितले.

बालगांव येथील अल्लमप्रभू देवस्थानालगत हळेकन्नड लिपीतील एक शिलालेख आढळून आला. भग्नावस्थेतील शिलालेखावर सूर्य-चंद्र, शिविलग, गाय-वासरू, कटयार अशी चिन्हे कोरली आहेत. या शिलालेखांच्या अभ्यासासाठी डॉक्टर. महेंद्र बोल कोटगी (जमगी), प्रभाकर सलगर (बालगाव) , मधु पाटील (बालगाव) हे आले होते. यांच्या अभ्यासातून असेही निदर्शनास आले की, या लेखात बालगावातील कळमेश्वर स्वामिना बिज्जल कलचुर राजाने या ग्रहणाच्या दिनी दान दिल्याचा उल्लेख आहे.

बिज्जल कलचुरीचा ह्या जिल्ह्यात सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे. बिज्जल कलचुरी हा चालुक्यांचा नातेवाईक होता. माहितीनुसार, बिज्जल राजा खूप पराक्रमी होता. तो मांडलिक राजा होता.

त्याने चालुक्यांचे मांडलिकत्व झुगारून सांगली, सातारा, सोलापूर या भूभागांवर आपली सत्ता स्थापन केली. हे जे शिलालेख सापडले आहे ते बिज्जल राजाची कारकीर्द तसेच चालुक्यांची सांगलीत असलेली सत्तेची कथा सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button