राष्ट्रवादीच्या कमाईचे मनसुबे उच्च न्यायालयाने उद्ध्वस्त केले : आशिष शेलार
मुंबई : राज्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करून त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निधी उभा करीत असल्याचे प्रकरण पुढे आले होते . राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबंधी १४ जुलैला पत्र पाठवून असे प्रशासक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ११ हजार रुपयांची बिनपरतीची ठेव पक्षनिधी म्हणून घेण्याचे सुचविले आहे. त्यातून राष्ट्रवादी कॉँग्रेस वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता ग्रामपंचायत प्रशासकाच्या नेमणुकीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शासकीय अधिकारी निवडा असे आदेश सरकारला दिले आहेत . यावर आता भाजप नेते आशिष शेलार
11 हजार रुपये देणगी घेऊन कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे राष्ट्रवादीच्या कमाईचे मनसुबे मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उध्वस्त झाले. न्यायालयाचे आभार!
पण आता अधिकाऱ्यांच्या प्रशासक नियुक्त्यांचा पण "नवा व्यवहार" सुरू होऊ नये?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 23, 2020
यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे .
शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की , 11 हजार रुपये देणगी घेऊन कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे राष्ट्रवादीच्या कमाईचे मनसुबे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उध्वस्त झाले. न्यायालयाचे आभार! पण आता अधिकाऱ्यांच्या प्रशासक नियुक्त्यांचा पण “नवा व्यवहार” सुरू होऊ नये? , अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे .



