जबाबदाऱ्या आणि चुका ! या एका नाण्याच्या दोन बाजू
बरेच लोक जबाबदारी घ्यायला घाबरतात. याला कारणही तसेच असते. कारण जबाबदारी आली की चुकांचे खापर आपल्याच डोक्यावर लोक फोडणार या भीतीने आणि समजुतीने लोक जबाबदारी घ्यायला मागत नाही. यशस्वी होण्याच्या संधी सुद्धा या जबाबदार्यांनी येतात हे मात्र आपण विसरतो. रतन टाटा, सुधा मूर्ती , स्टीव्ह जॉब्स हे सुद्धा असेच जबाबदारी घेऊनच वर आले आहेत असे बोलण्यास हरकत नाही. पण तरीही सामान्य लोक मात्र जबाबदारी घ्यायला घाबरतात. जर तुम्हाला असे सांगितले की जबाबदारी घेण्याचे तोट्यापेक्षा फायदे जास्त आहेत हे? हो जबाबदारी घेतल्याने चुकांचा खापर आपल्यावर फुटत हे जेवढे खरे आहे तेवढच खरं हेही आहे की आपल्याला जबाबदारीसोबत अधिकारही मिळतो.
जबाबदारी आणि चुका या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना वेगवेगळं नाही करू शकत. लेखक मार्क मॅनसोन यांनी आपल्या एका ब्लॉग मध्ये असे लिहले आहे की, जबाबदारी सोबत जो अधिकार मिळतो तो होणाऱ्या चुकांपेक्षा जास्त फायदेशीर असतो. कारण चुका सुधारवता येतात त्यांना माफ करता येत, थोडा तोटा झेलावा लागतो पण जो अधिकार हातात येतो त्यात तुम्ही जग जिंकू शकता एवढी ताकद असते.
एक उदाहरण घेऊ, न्यायाधीश हा गुन्हेगार नसतो किंवा गुन्ह्याला सोबत करणारा नसतो पण तो न्याय देणारा असतो आणि त्याने जो न्याय दिलाय तो न्याय त्या परिस्थितीवर अवलंबून असतो आणि पुराव्यांवर अवलंबून असतो. पण लोक हे त्या न्यायाधीशाला जबाबदार ठरवतात. न्यायाधीशाची चूक असो व नसो त्याच्या हातात काहीही नसत. तसच जबाबदारी जेव्हा दिली जाते तेव्हा चूक ही दुसर्यांनी केली तरी तुमच्यावर जबाबदारी असल्याने तुम्हालाच त्यांचा त्रास सोसावा लागतो.
जबाबदारी आणि मोकळेपणा
जबाबदारीच फायदा हा आहे की यामुळे तुम्ही आणखी कणखर बनू शकता. तुम्ही जबाबदारी घ्यायला लागाल तेव्हा तुम्हाला तुमच्या भावना, त्रास, यश, आनंद या सारख्या भावना सांभाळायची सवय होऊन जाईल. तुम्ही जास्त हुरळून जाणार नाही किंवा जास्त दुःखी सुद्धा होणार नाही. तुम्ही स्थितप्रज्ञ राहाल. रागराग करणे, त्रास करून घेणे या गोष्टीसुद्धा आपोआप कमी होतील. त्यामुळे जबाबदारी घ्या आणि चुका झाल्या तरी घाबरू नका.