मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील पाटणा गावाजवळ मंगळवारी सकाळी एका बस पुलावरून पुलावरुन खाली पडल्याने सात महिलांसह 35 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. बाणसागर कालव्यातून आतापर्यंत एकूण 18 मृतदेह काढण्यात आले असून बाकीच्यांना शोध मोहीम अजून चालू आहे अशी माहिती महानिरीक्षक (रीवा झोन) उमेश जोगा यांनी दिली. “इतर 20 प्रवासी बेपत्ता असल्याची भीती असून शोध आणि बचावकार्य सुरू आहे,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
माहितीनुसार, वाराणसी येथील एनडीआरएफच्या पथकाने कालव्यातून आतापर्यंत 35 हून अधिक मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतांचा आकडा 40 ओलांडू शकतो. उमेश जोगा असे म्हणाले की, सकाळी ८:३० च्या दरम्यान सिधी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ८० कि.मी. अंतरावर पाटणा गावाजवळ बस कालव्यात बस खाली पडल्यानंतर त्यातील फक्त ७ जण हे पोहता येत असल्याने त्यातून सुरक्षित बाहेर आले.
माहितीनुसार बसचा जेव्हा अपघात झाला तेव्हा किमान ५० प्रवासी प्रवास करत होते. ज्यांनी हा अपघात पप्रत्यक्ष डोळ्यांनी पहिला ते असे सांगतात की, बस पूर्णपणे पाण्यात बुडाली आणि सकाळच्या वेळी दिसत नव्हती. दोन क्रेनच्या सहाय्याने ही बस कालव्याबाहेर काढली गेली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, त्यांनी बाणसागर धरणातील पाण्याचा प्रवाह थांबविण्याचे आदेश दिले जेणेकरून कालव्यातील पाण्याची पातळी खाली जाऊ शकेल, ज्यायोगे बचाव कार्यात मदत होईल. राज्य आपत्ती प्रतिसाद बल (एसडीआरएफ) आणि स्थानिक अधिकारी यांचे पथक घटनास्थळावर बचावकार्य करीत असल्याचे त्यांनी ट्विट केले. मृतांचा आकडा न सांगता मुख्यमंत्री म्हणाले की या अपघातात अनेक “अनमोल जीवन” गमावली आहेत.
दरम्यान, दुर्घटना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हाऊस-वार्मिंग सोहळा रद्द केला आहे. प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) मध्य प्रदेशात एक लाखाहून अधिक घरांच्या लाभार्थ्यांसाठी भोपाळमधील सकाळी ११ वाजता मिंटो हॉलमध्ये होणार असलेल्या या कार्यक्रमात शहा भाग घेणार होते.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी अमित शहा यांनी ट्विट द्वारे शोक प्रकट केला आहे . ते यात अस बोलतात की, मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील बस अपघाता बाबत मी अतिशय दु: खी आहे, मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन मदत व बचावासाठी सर्वतोपरी मदत करत आहे. मृतांच्या नातेवाईकांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमीं लवकरच बरे होतील याची आशा करतो .