जैन समाजाच्या साधु-साध्वींना चातुर्मास स्थळी पोहचण्यासाठी परवानगी
मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक भागातून साधु-साध्वी प्रवास करू शकत नाहीत. परंतु चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारित स्थळी पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे शर्थींचे पालन करण्याच्या अटीवर जैन समाजाच्या साधु-साध्वी व सेवक वर्ग यांना त्यांच्या चातुर्मास स्थळी पोहचण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे सचिव यांच्या सहीचे पत्र मुंबई पोलीस आयुक्त व जिल्हाधिका-यांना दिले आहे.
सचिवांनी पोलिस आयुक्तांना दिलेले पत्र –
१) काही वृध्द साधु-साध्वी प्रकृतीच्या कारणास्तव हील चेअरने प्रवास करतात. या प्रकारे प्रवास करून हे साधु-साध्वी चातुर्मास स्थळी त्यांच्या सेवक वर्गासह पोहचतात.
२) कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक भागातून साधु-साध्वी प्रवास करू शकत नाहीत. परंतु चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारित स्थळी पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे जैन समाजाच्या साधु-साध्वी व सेवक वर्ग यांना त्यांच्या चातुर्मास स्थळी पोहच लील अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.
3) पायी प्रवासा दरम्यान गर्दी होणार नाही. व५ पेक्षा जास्त जण एकत्रित प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी २) ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे. त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता प्यावी ३) कोकोड-१९ संदर्भातील केंदब राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
४) प्रवासा दरम्यान २ व्यक्तोमध्ये पुरेसे अंतर ठेवाये (Social Distancing) व मास्कचा वापर करण्याची दक्षता घ्यावी.
त्यांच्या प्रचारादरम्यान व मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता य एकूणच कायदा व सुव्यवस्था रावली जाईल याची जिल्हा पोलीस प्रशासनाने दक्षता घ्या. असे पत्रात नमुद आहे.

