औरंगाबाद (संभाजी नगर) - Aurangabad

औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पाटीवर संभाजीनगरची पाटी

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्यात यावं अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या वादावरूनच रविवारी औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पाटीवर असलेले औरंगाबाद हे नाव खोडून तिथे संभाजीनगर अशी पाटी लावण्यात आली. या घटनेने औरंगाबाद शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारावरून शिवसेना आणि एमआयएम यांच्यातला वाद उफाळून आला. ही पाटी लावणाऱ्याने आपण शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत असे सांगितले आहे. ज्यानंतर शिवसेना आणि एमआयएम यांच्यातला वाद समोर आला आहे. याप्रकरणी एमआयएमचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना सांगितली. या प्रकरणी संबंधित कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे अनधिकृतपणे नाव बदलल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Image Source : ANI

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button