Sportsक्रिकेटक्रीडा

इंग्लंडविरुद्ध टी -२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव, युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तसेच राहुल तेवतिया यांची इंग्लंडविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे सूर्यकुमारचे स्वप्न अखेर साकार होणार आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे फळ सूर्यकुमारला मिळाले आहे. मुंबई इंडियन्सकडून चमकदार कामगिरी करणारा किशन हा ऋषभ पंतनंतर भारतीय संघातील दुसरा यष्टीरक्षक असेल. सूर्यकुमारने ‘आयपीएल’च्या १३व्या पर्वात ४८० तर किशनने ५१६ धावा केल्या होत्या. तेवतियाने राजस्थान रॉयल्सकडून शानदार कामगिरी केली होती.

डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आणि मनीष पांडे यांना संघातून डच्चू देण्यात आला असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकलेला उपकर्णधार रोहित शर्माचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button