मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांचे परिवर्तन होण्याची माहिती रेल्वे विकास महामंडळाने आखलेल्या योजनेतुन समोर आली. कांदिवली, मीरारोड आणि गुरू तेज बहादूर नगर (जीटीबी) या रेल्वे स्थानकांमध्ये लवकरच खाण्याचे स्टॉल्स, ओपन एअर रेस्टॉरन्ट आणि इतर सोईसुविधा देण्यात येणार असून या बरोबरच मुंबईतील इतर १६ रेल्वे स्थानकांचा पुढील ५ वर्षांमध्ये कायापालट करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरात असलेल्या स्थानकांपैकी ११९ स्थानके ८० वर्षांहून अधिक जुनी आहेत. मुंबई महानगरीचा विचार करताना फक्त नवी मुंबईतील स्थानके युजर फ्रेंडली आहेत. रेल्वे स्थानकांच्या विकासाला रेल्वे विकास महामंडळाचे चेअरमन आर. एस. खुराना यांनी दुजोरा दिला आहे.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.


