जगातील सर्वाधिक काळ सेवा दिलेली आणि भारतीय नौदलातून निवृत्त झालेली नौका ‘आयएनएस विराट’संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तो म्हणजे, या युद्धनौकेला तोडून भंगारात विकणे. या युद्धनौकेने भारतीय नौदलात ३० वर्षे सेवा केली. न्यायालयाने ‘आयएनएस विराट’ संदर्भात स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली ए.एस.बोपण्णा व व्ही. रा
मसुब्रमण्यम यांच्यासह तीन सदस्यीय खंठपीठाने हा निर्णय घेतला. ८० च्या दशकात भारतीय नौदलाने ६५ दशलक्ष डॉलर्सला ही युद्धनौका घेतली होती. ती १२ मे १९८७ ला भारतीय नौदलात सामील करण्यात आली. ‘आयएनएस विराट’ विमानवाहू जहाजाचे भाग तोडण्याचा निर्णय जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्याने सरकारने घेतला होता.
नौदलातून काढून टाकण्यात आलेले आयएनएस विराट ऐतिहासिक युद्धनौका मोडीत काढण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सध्याची स्थितीत आयएनएस विराट ऐतिहासिक युद्धनौका तोडण्यास मनाई केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही युद्धनौका खरेदी करणाऱ्याला देखील नोटीस बजावली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून असेही म्हटलं जात आहे की, भविष्यात ही युद्धनौका जपून ठेवायची आहे. यासह खरेदीदाराला १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, खरेदीदाराने ती नौका भंगारात घेण्यासाठी खरेदी केली असल्याची माहिती आहे.
या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ‘एन्व्हीटेक मरीन कन्सल्टंट प्रा. लि. कंपनी’ने यासंदर्भात याचिकादेखील दाखल केली होती. ‘आयएनएस विराट’ हे जगातील सर्वांत प्रदीर्घ युद्धनौका आहे. ही युद्धनौका सेंटॉर वर्गातील दुसरी होती. या युद्धनौकेवर सागरी संग्रहालय करण्याचा प्रस्ताव होता. केंद्राच्या म्हणण्यानुसार, जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्याने युद्धनौका तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१४ मध्ये तोडण्यात आलेल्या ‘आयएनएस विक्रांत’नंतरची ही दुसरी युद्धनौका आहे. ‘मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन’तर्फे करण्यात आलेल्या लिलावात श्री राम समूहाने ३८.५४ कोटी रुपयाला ‘आयएनएस विराट’ विकत घेतले होते.
१९८२ मध्ये अर्जेंटिना विरुद्धचे फॉकलंड युद्ध रॉयल ब्रिटिश नौदलाने जिंकले होते. त्यावेळी ही विमानवाहू युद्धनौका वापरण्यात आली. तिचे वजन २७,८०० टन आहे. या युद्धनौकेने ब्रिटनच्या नौदलात सेवा केली. १९५९ ते १९८४ च्या काळात ‘एचएमएस हर्मीस’ नावाने ती ओळखली जात होती. नंतर या युद्धनौकेची दुरुस्ती करून ती भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आली.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, महाराष्ट्र शासनाने दुरुस्तीसह सेवेतून मुक्त झालेल्या या जहाज आयएनएस विराटचे जतन करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. यासंदर्भात शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संरक्षण मंत्रालयाला पत्र लिहिले होते. संरक्षण मंत्रालयाकडे यासंदर्भात एनओसीही मागविण्यात आली होती. यावेळी चतुर्वेदी म्हणाले की, या ऐतिहासिक युद्धनौकाचे पुनरुज्जीवन आणि जतन केल्यास महाराष्ट्राला आनंद होईल. गुजरातमधील अलंगमध्ये आयएनएस विराटला भंगारमध्ये तोडण्याचे काम सुरू करण्यात आले ही फार काळजीची बाब आहे, असे ही ते म्हणाले.

