Maharashtra GovPoliticsमुंबईशहर

इंधन दरवाढीमुळे सामन्यांचे आर्थिक नुकसान !

मुंबई: भारत न्यू नॉर्मल कडे वळत असताना जानेवारीपासून इंधनदरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित हे बिघडत आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डीझेल च्या दरात सुमारे ५ रुपयांनी वाढ झाली आहे. हा सारखा पेट्रोल आणि डीझेलचा चढता उतरता आलेख यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत. त्यातून महागाई वाढल्याने आणखी हालापेष्टा लोकांना सहन कराव्या लागत ­­­­आहे.

मंगळवारी मुंबईत पेट्रोल ३४ पैसे तर डीझेल ३७ पैश्यांनी वाढले. म्हणजेच एकूण इंधनदरात एकूण ७१ पैश्यांनी वाढ झाली. त्यात बुधवारी पुन्हा यात ५६ पैश्यांची वाढ झाली. डिझेलच्या दर वाढीमुळे प्रामुख्याने मालवाहतुकीवर जास्त परिणाम झाला आहे. सामाजिक वाहतूक ही फक्त अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी पूर्ण स्वरुपात खुली असल्याने खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचार्यांना नाईलाजाने खाजगी बस व टॅक्सी वरती अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे प्रवासाचा खर्च हा नेहमीपेक्षा जास्त होत आहे.

रेल्वेचे वेळापत्रक ठीक नसल्यामुळे तसेच ठराविक वेळेत प्रवास करण्यासाठी परवानगी असल्याने लोक हे त्रासुन गेले आहे. देशात चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल, डीझेल हे सर्वाधिक महाग आहे. महाराष्ट्रात सरासरी डीझेल ९५.८५ रुपये असे आहे. आता सध्या लोकल ट्रेन्सचे वेळापत्रक लवकरच बदलण्यात येत असून ती सर्वासाठी नियमित चालू करण्यात येईल असे मुंबई महापालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी आणि दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button