Maharashtra GovPoliticsShivSena-Congress-NCPमुंबई

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजितदादांची भूमिका काय?, सर्व हालचालींवर शिवसेनेचे लक्ष

मुंबई : भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली . मात्र सध्याच्या घडामोडींवरून आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र आहे . सत्तास्थापनेनंतर पवार-ठाकरे भेटी अनेकदा चर्चेत आल्या आहेत. इतकेच नाही तर महाविकास आघाडीतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत .

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत ताळमेळ दिसत नाही . कधी बदल्या, लॉकडाऊन, आदित्य ठाकरे तर कधी पार्थ पवारांवरून या दोघांमध्ये एकमत नसल्याचं बऱ्याचदा समोर आलंय. त्यात पवारांनी पार्थबद्दल केलेल्या वक्तव्यांने आता शिवसेना संभ्रमात पडली आहे. हाविकास आघाडीची चर्चा सुरु असताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन शपथ घेतली होती. आता शरद पवारांनी पार्थबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार काय भूमिका घेणार ? याकडे शिवसेनेचे लक्ष आहे .

महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी चर्चा सुरु असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पुन्हा याचीच पुनरावृत्ती होणार नाही ना? याची खबरदारी शिवसेना घेताना दिसत आहे . शिवसेनेचे आमदार आणि नेते सध्या यावर आपआपसांत चर्चा करताना दिसत आहेत.तसेच तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये काय चर्चा सुरु आहे याचादेखील आढावा घेतला जातो.

दरम्यान पार्थ पवार यांना शरद पवारांनी फटकारल्यापासून अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थविषयी बोलण्यास नकार दिला आहे.

पार्थविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे . शरद पवार यांनी सार्वजनिकरीत्या फटकारल्यानंतर पार्थ पवार वेगळा निर्णय घेण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button