टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवचे संघात पुनरागमन झालं आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma, Mayank Agarwal, Shubman Gill, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane (vc), KL Rahul, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), Wriddhiman Saha (wk), R Ashwin, Kuldeep Yadav, Axar Patel, Washington Sundar, Ishant Sharma, Jasprit Bumrah, Md. Siraj.
— BCCI (@BCCI) February 17, 2021
इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. शार्दुल ठाकूर ऐवजी संघात उमेश यादवचा समावेश करण्यात येऊ शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत दुखापतीमुळे संघाबाहेर झालेल्या उमेश यादवला पुन्हा संधी दिली जाऊ शकते. त्याची फिटनेस टेस्ट झाल्यानंतर निवड समिती याबाबत निर्णय घेईल. शार्दुलला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी सोडण्यात आले आहे. भारतीय संघाच्या १७ सदस्यांमध्ये केएल राहुलचा समावेश करण्यात आला आहे. राहुल देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव करताा जखमी झाला होता.
या शिवाय नेट गोलंदाज म्हणून असलेले अभिमन्यू ईश्वरन, शाहबाज नदीम आणि प्रियंक पंचाल यांना विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीझ करण्यात आले आहे. निवड समितीने पाच नवे नेट गोलंदाज निवडले आहेत. यात अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गौतम, सौरभ कुमार यांचा समावेश आहे. तर राखीव खेळाडू म्हणून केएस भारत आणि राहुल चाहर यांना निवडले आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 24-28 फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा डे नाईट सामना असणार आहे. गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या मोटेरा स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे.4 सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील प्रत्येकी 1 सामना इंग्लंड आणि टीम इंडियाने जिंकला आहे. त्यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. यामुळे तिसरा कसोटी सामना हा या मालिकेच्या दृष्टीने चुरशीचा असणार आहे.
